Mahaparyatan | Tourism Management System TMS | Package Details

पृथ्वी वरील स्वर्ग भू नंदनवन काश्मिर सहल, वैष्णोदेवी,रघुनाथ मंदिर सहित

#PKG-22

Package Type : .

Package Location : PUNE

Features : रेल्वे प्रवास 1) पुणे ते जालंधर 3 एसी स्लीपर रेल्वे. 2) जम्मू ते पुणे 3 एसी स्लीपर रेल्वे. बस प्रवास जालंधर रेल्वे स्टेशन वरून पीक अप ते जम्मू रेल्वे स्टेशन ड्रॉप पर्यंत 2 बाय 2 लगझरी पुश बॅक सीट बस. भोजन व्यवस्था महाराष्ट्रीयन पद्धतीने जेवण, 2


Grand Total

INR 31500

Package Details

पहिला दिवस 
2 मे 2025 :- सायंकाळी 5:00 वाजता झेलम एक्सप्रेसने जम्मू करिता रवाना.
 दुसरा दिवस 
03 मे 2025 :- रेल्वे प्रवास.
 तिसरा दिवस 
04 मे 2025 :- सकाळी 10:00 वाजता जम्मू येथे आगमन व तेथून बस ने जम्मू येथे हॉटेल  कडे रवाना हॉटेल मध्ये चेक इन करून(फक्त अंघोळ व फ्रेश होण्यासाठी काही रूम घेणार आहोत.) फ्रेश झाल्यानंतर जेवण करून पहलगाम करीता रवाना आगमन व मुक्काम पहलगाम .
 चौथा दिवस 
05 मे 2025 :- दिवसभर बेताब व्हॅली, चंदनवाडी,ग्रीन व्हॅली इत्यादी करून पहलगाम मुक्काम.
 पाचवा दिवस 
06 मे 2025 :- सकाळी नास्ता उरकून गुलमर्ग करिता रवाना तेथे जगातील सर्वात उंच गंडोला (रोप वे), (ज्यांना रोप वे ने जायचे आहे त्याने तिकीट काढायचे आहे हे ऑनलाईन मिळते)जयजय शिव शंकर हे गाणे शूट झालेले मंदिर इत्यादी पाहून श्रीनगर आगमन व मुक्काम श्रीनगर.(येथे पार्किंग पासून पुढे जाण्यासाठी तेथील लोकल गाड्या जातात पैसे ज्याचे त्याने भरायचे आहेत.)
सहावा दिवस 
07 मे 2025 :- सकाळी नास्ता उरकून सोनमर्ग करिता रवाना या ठिकाणी बऱ्याच हिंदी सिनेमा शूटिंग झाले आहे जसे सत्ते पे सत्ता, दिलवाले वगैरे, तसेच हझरतबाल दर्गा इत्यादी सर्व पाहून पुन्हा श्रीनगर आगमन व मुक्काम श्रीनगर.(येथे पार्किंग पर्यंत आपल्या गाड्या जातात पुढे तेथील लोकल गाडी वापरावी लागते त्याचे पैसे ज्याचे त्याने भरायचे आहेत.)
 सातवा दिवस 
08 मे 2025 :- दिवसभर श्रीनगर दर्शन जसे शंकराचार्य मंदिर, दल लेक, निशांत बाग, शालिमार बाग, शिकारा मध्ये फिरणे इत्यादी करून श्रीनगर मुक्काम.
 आठवा दिवस 
09 मे 2025 :- सकाळी लवकर नास्ता उरकून कटरा करीता रवाना आगमन व मुक्काम.(जर कोणास रात्री माता वैष्णोदेवी दर्शनास जायचे असेल तर जाऊ शकता)

 नववा दिवस 
10 मे 2025 दिवसभर माता वैष्णोदेवी दर्शन व मुक्काम.(हेलिकॉप्टर तिकीट काढून देऊ प्रती व्यक्ती खर्च 4600)तीन महिने अगोदर मिळते.
दहावा दिवस 
11 मे 2025  दुपारी जेवण करून जम्मू करीता रवाना तेथे रघुनाथ मंदिर दर्शन व मनसोक्त खरेदीचा आनंद घेऊन रात्री 10:30 वाजता झेलम एक्स्प्रेसने पुण्या साठी रवाना. 
 अकरावा दिवस
12 मे 2025 रेल्वे प्रवास
 बारावा दिवस
13 मे 2025 मनात असंख्य आनंदी आठवणी ठेवत दुपारी 4:00 वाजता पुणे आगमन सहल समाप्त.
 

Travels





Copyright 2022 Maharashtra Paryatan Sarkari Sanstha Pune Authority. All rights reserved. Design & Develop By Techbeyond Solution LLP.